September 14, 2012

पांढरा बुधवार - महती ( श्री लक्ष्मी व्रत )



 आमच्या स्नेही  सौ  उमा नेने यांनी  ५ बुधवार व्रत  केले आणी त्यांना आलेला 
अनुभव   इमेल द्वारे  कळवला.   यात त्यांनी बुधवारचे व्रत कसे करावे हे सांगितले आहे
 हा त्यांचा अनुभव वाचकांना ही उपयोगी  पडेल म्हणून इथे देत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

uma nene
11:52 PM (9 hours ago)


to me
नमस्कार
मी गायिका आहे.मी हिंदी मराठी गाण्याचे कार्यक्रम करते.सध्या मी वन वूमन शो करत आहे.कारओके software वर.मी माले वोईचे मध्ये गाऊ शकते.लहान मुलाच्या आवाजात गाऊ शकते.आणि खूप आवाजात गाऊ शकते.मी ८ वर्ष लंडन ,सिंगापूर ,अबुधाबी इ ,ठिकाणी कार्यक्रमासाठी गेले होते.माझे गायनाचे  क्लास आहेत.
संकट कधी कुठे कशी येतील काही सांगता येत नाही.तसच काहीस माझ्याबाबतीत घडलं.नशिबाची साथ होती म्हणून थोडक्यात ते संकट संपलं.ते मला तुमच्याबरोबर शेअर  करायला आवडेल.
माझ  ICICI बँकेत account होत ,मुलाच्या admission साठी तिथे मी काही पैसे ठेवले होते.आणि बाकी काही अजून रक्कम ही होती.जिला आम्ही हात लावायचा नाही असं ठरवलं.नेट बँकिंग account एकदा सहज check केल आणि मला heart attack कसा काय नाही आला.कोणीतरी माझ्या
account hack करून ७५००० रुपये काढले होते.काहीच सुचत नव्हत.fir केल.बँकेत भेटी सुरु झाल्या ,रात्ररात्र झोप नाही.माझ्या भावाने त्या माणसाचा शोध लावला ,तो IT वाला आहे त्यामुळे त्याने लगेच शोध सुरु केला.आणि त्यात त्याला यश आलं.कोणी पैसे घेतले आहेत ते कळल.त्या माणसाला phone सुरु झाले .त्याकाळात सगळे माझ्या पाठीशी होतेच.आई म्हणाली जर त्या माणसाने पैसे दिले तर ५ पांढरे बुधवार करीन असं म्हण.मी लागेच तसं mhanatala .८ महिन्यांनी त्या माणसाने सगळे पैसे ,मागे लागून धमक्या देऊन ,परत केले .जीवात जीव येणे म्हणजे काय असतं ते तेव्हां मला कळल.
आईनी मला आठवण करून दिली संकटकाळी आपण जे काही नवस बोलतो ते लगेच फेडावेत.
मग मी ५ पांढरे बुधवार चातुर्मासात सुरु केले आणि १२ सेप्ट.ला उद्यापन केल.हे उपास केल्याने खूप चांगले अनुभवही आले.समाधान मिळालं.हे लक्ष्मीचे उपास आहेत.ज्याला जमेल त्यांनी नक्की करावेत.ते कसे करावेत ते ही सांगते.पहिल्या बुधवारी जे पांढर खाल तेच ५ ही बुधवार खायचे.salt अजिबात खायचं नाही.आळणी  उपास करावयाचे.दुध केळ,साबुदाणा खीर .संध्याकाळी हात पाय धुवून अन्नपूर्णा देवीला दुध /पंचामृत ,पाणी असे स्नान घालावे.एक पांढर फुल वाहाव.जे ५ बुधवार तेच वाहता येईल.सहज मिळेल असे.हळद कुंकू वाहाव .दुधसाख्रर ठेवावी प्रसाद म्हणून.नमस्कार करावा.आणि १०८ वेळा -ओम श्री शुक्ला महा शुक्ले निवासे ,श्री महालक्ष्मी नमो नमः .हा मंत्र म्हणावा .पुजेची वेळ १च ठेवावी ७ ते ८ च्या दरम्यान.मग उपास सोडवा गरम भात व दुध ,दही.salt नाही.कमी बोलावे.तसेच दिवसभर पांढरे वस्त्र घालावे

महिलांना अडचण आल्यास उपास करावा पण तो बुधवार धरू नये.
उद्यापनाला सकाळपासून उपास करावा . सवाष्ण बोलवावी तिची ओटी भरून पांढर कापड ,पांढरी वस्तू ,गजरा असं द्याव.नमस्कार करावा.पूजा जी आपण केली ती पुजा करायची.नैवेद्य दाखवायचा .सगळा नेहमीचा स्वयपाक करायचा.खीर  व पक्वान्न पांढर असावयास हव .(शेवयाची खीर,मोदक इत्यादी ).नैवेद्याच ताट तिला द्याव.मग आपण उपास सोडावयास बसाव.
मला जसे ह्या  उपासाचे फळ मिळाले तसेच तुम्हालाही मिळेलअनुभव सांगते थोडक्यात ;.न होणारी काम अचानक वेग घेतात,तब्येतीच्या तक्रारी संपतात ,भरभराट होते.
खूप छान वाटतय मला हे शेअर करायला.धन्यवाद,
कळावे
आपली
सौ.उमा नेने

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या