October 5, 2012

बुध - शनी युती

  आज तुळ राशीत   बुध शनी युती होत आहे . श्री व. दा भट यांनी आपल्या  ' समग्र - ग्रहयोग '  या पुस्तकात या युती बद्दल चांगली माहिती दिली आहे.

बुध - शनी युती कुंडलीत शुभ संबंधीत असता , स्थान राशी वा भावेश बल अस्तां ही युती  कुंडलीत बौध्दीकदृष्ट्या  फारच शुभफलदायी होऊं शकते.  अशा व्यक्ती मोठ्या विद्वान , हुशार व उद्योगी आढळतात. मिथून, तुळ, कुंभ राशीत  युती असणारी मंडळी मोठी धडाडीची  व बौध्दिक क्षेत्रात  संशोधन व नाविन्य निर्माण करणारी आढळतात.
लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, एडिसन, , पु.भा. भावे , आईनस्टाईन यां बुध्दीमान लोकांच्या पत्रिकेत  बुध - शनी  युती आहे.

अर्थात ही युती स्थान व राशीसंबंधीत शुभ नसता  एक अत्यंत असा अशुभ योग ठरतो.  बुधाच्या कारकत्वाची शनि कुचंबणा करतो.  ही युती कुंडलीत ६.८,१२ स्थानी असता, पापग्रहाच्या कुयोगात असता अत्यंत अशुभ परिणाम बुध्दीमतेच्या दृष्टीने देते.  बुध हा बौध्दीक  व मानसिकदृष्ट्या शनीने जास्त दुषित होत अस्ल्याने अशा व्यक्ती कित्तेक वेळा कारण नसताना काळजी करणा-या असतात  आत्मविश्वास व उत्साहाचा अभाव असतो. लवकर निराश होतात

बुध शनी युती संततीच्या दृष्टीनेही प्रतिकूल असते.  गुरु अशुभ संबंधीत असता , लग्न, पंचम, नवम, सप्तम, लाभ स्थानातील युती  पुत्रसंततीचा अभाव अथवा अजिबात संतती नसणे वगैरे फल देते.





1 comment:

GHANSHYAM said...

please please set up u r website just simple and clean it is very disorganized just let put by subject wise and u have very log list of photos o god on u r site it is very in my opinion is boaring
just paste one photo but natural beauty of real gods daily i have exapmle of simple website http://subhashite.blogspot.in/ i visit daily ..

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या