February 25, 2013

गुरुप्रतिपदा (श्री नृसिंह सरस्वती महाराज श्री शैलगमन)

उद्या २६ फेब्रुवारी रोजी गुरुप्रतिपदा आहे. - याविषयी   भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराज १०० वर्षे संपुर्ण भारत भ्रमण व ५० वर्षे श्री क्षेत्र गाणगापुर येथे वास्तव्य करुन एका महान तीर्थक्षेत्राची निर्मिती केली. निजगमनास जातांना स्वत:च्या निर्गुण पादुका श्री क्षेत्र गाणगापुर येथे सेवेकरिता ठेवल्या. या काळापासून परकीय सत्तांचा -हास व हिंदु राजसत्तेचा उदय झाला. भगवंताचा हा अवतार १५० वर्षे कार्यरत होता. त्या कार्याची नोंद आपल्याला वेदाइतकेच महत्व असलेल्या श्री गुरुचरित्र ग्रंथात बघावयास मिळते. माघ वद्य १ ला श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी श्री शैल्य ( कर्दळीवन )  गमन केले व गुप्तरुपाने कार्य चालु ठेवले. या दिवशी महाराजांचे श्री शैल्य गमनाचा उत्सव सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केन्द्रात साजरा केला जातो.


( संग्रहीत )

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या