February 6, 2015

श्री भराडीदेवी - आंगणेवाडी यात्रा

श्री भराडीदेवी - आंगणेवाडी यात्रा  - 7 February 2015


आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीचे मंदिर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. मालवण पासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर एका माळरानावर श्री भराडी देवीची यात्रा भरते. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी, अशी तिची ख्याती फक्त दक्षिण कोकणातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात पसरलेली आहे. या सर्व ठिकाणचे भाविक अतिशय आतुरतेने या जात्रोत्सावाची वाट पाहत असतात.ही यात्रा दोन दिवस चालते.
देवस्थान विषयी कथा
पेशव्यांच्या दाराबारात पूर्वी आंगणेवाडीचा एक देशभक्त होता. तो अतिशय पराक्रमी असल्याने त्याच्या देशेसेवेवर प्रसन्न होउन तुळजाभवानी एकदिवस या भारड भागात प्रकट झाली. एके दिवशी त्याची गाय एका झाडीत दुधाची धार सोडताना त्याने पहिले. त्याच रात्री तुळजाभवानीने स्वप्नदृष्टांतात आपण तेथे प्रकट झाल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याने साफसफाई करून तेथील पाषाणाची षोडशोपचारे पूजा केली. या जागृत देवीची पूजा-अर्चां करण्यासाठी पेशवे काळात चिमाजी अप्पांकडून काही एकर जमीन दान म्हणून देण्यात आली. या पासून मिळणाऱ्या उत्पन्नातून देवीची पूजाअर्चा आणि इतर खर्च केला जातो.

देवी सांगेली त्याच दिवशी यात्रा
देवदिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मंदिरात गावजेवण (दाळप ) असते. त्यानंतर डुकराच्या शिकारीस जाण्यासाठी प्रसाद (कौल) मागितला जातो . शिकार मिळाल्यावर ती वाजतगाजत मंदिरापार्यंतर आणली जाते . नंतर देवीच्या यात्रेसाठी कौल मागितला जातो . अशी यात्रेची तारीख निश्चित केली जाते . कोणतेही संकट आले , तरी मग ही तारीख पालटता येत नाही .
जत्रेच्या दिवशी उत्सवमूर्ती सजवली जाते . त्यानंतर तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि नंतर आरसा दाखवतात . याचे कारण असे सांगतात की , देवीचे छायाचित्र सहसा काढले जात नसल्याने आणि घरात हे छायाचित्र लावून शुचिर्भूतता न पाळल्यास घरातील लोकांना त्रास होतो ; यासाठी हा आरसा दाखवतात.3
कौल आणि अवसार
देवदिवाळी ते जत्रेनंतर प्रसाद वाटेपर्यंतर आणि वेळ पडल्यास होळीपर्यंत देवीला कौल लागत नाही . कौल लावण्यासाठी तांदूळ (अक्षता ) वापरले जातात . कौल फक्त देवीच्या कार्यासाठीच लावला जातो . हा अवसार वर्ष्यातून दोनदा येतो आणि एक ते दीड मिनिटेच असतो . जत्रेच्या पहाटे जत्रा मान्य झाल्याचे सांगून निघून जातो .
सूर्याची किरणे अन् यात्रेचा प्रारंभ
यात्रेच्या दिवशी सुर्योदयानंतर नाभिक बांधव आरशाने सूर्याची किरणे देवीच्या मुखकमलावर पाडतो . तेव्हा प्रारंभीची पूजा होऊन जत्रेचा प्रारंभ होतो . जत्रेच्या दिवशी श्री भाराडीदेवीच्या स्वयंभू पाषाणाला मुखवटा घालून साडीचोळी नेसवली जाते . अलंकारही घातले जातात . सकाळपासून ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू असतो . सायंकाळी ८ वाजेपार्यंत हा कार्यक्रम चालू असतो . रात्री ९ वाजता हा कार्यक्रम बंद झाल्यावर आंगणेवाडीतील प्रत्येक घरातील महिला स्नान करून कोणाशीही न बोलता जेवण करण्यास प्रारंभ करतात . हा प्रसाद रात्री देवीला नैवेद्य म्हणून दाखवतात . यालाच ताटे लावणे असे म्हणतात . या प्रसादात भात , भाजी , वडे , सांभार यांचा समावेश असतो . त्या महिलांसोबत आंगणे पुरुष मंडळी हातात पेटत्या मशाली घेऊन त्यांना गर्दीतून वात दाखवत असतात .
या जत्रेला येणाऱ्या लाखो भाविकांची सेवा करणे म्हणजे भाराडीदेवीची भक्ती करणे , असे आंगणेवाडीकर मानतात. आंगणेवाडी ग्रामस्त आणि आंगणेवाडीतील मुंबईकर नोकरदार , असे सुमारे १ सहस्त्र जत्रेच्या दोन दिवस अगोदर आणि दोन दिवस नंतर अहोरात्र परिश्रम घेत असतात . ते शिस्तबद्ध पद्धतीने जत्रेचे नियोजन करतात . भाविकांना सुखासुविधा मिळण्यासाठी ग्रामस्थ आणि शासकीय यंत्रणा यांच्या सहकार्याने उत्सव शांततेत पार पाडला जातो .
आज २१ साव्या शतकात प्रवेश करताना या मसुरे गावची एक वाडी असलेले आंगणेवाडी भाराडीमातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांमुळे त्याच प्रमाणे मुख्यमंत्री आणि ईतर मंत्रीमहोदयांच्या भेट देण्याने प्रतिपंढरपूर म्हणून शोभून दिसू लागले आहे . आंगणेवाडी जात्रोत्सवाला येणाऱ्या भाविकांमध्ये काही जण भाराडीमातेचे भक्तिभावाने दर्शन घ्येण्यासाठी येतात , तर काही जण नवस बोलायला येतात आणि काही जण नवस फेडायला येतात . मात्र या तिन्ही प्रकारच्या अबालवृद्ध स्त्री – पुरुष भाविकांची अलोट गर्दी एका श्रध्येने होते , ती म्हणजे देवीच्या कृपाशिर्वादासाठीच ! अशा या श्री भाराडीदेवीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

संकलक- श्री दैवेश रेडकर, कुडाळ , जिल्हा सिंधुदुर्ग  सौजन्य- दैनिक सनातन प्रभात








No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या