June 2, 2015

स्पर्धेचा निकाल केंव्हा लागेल ?

आज जरा वेगळ्या विषयावर  लेख : स्वत:चीच परीक्षा म्हणा ना ! 
एक प्रश्ण पडलाय , एका स्पर्धेत भाग घेतलाय 

स्पर्धेचा  निकाल केंव्हा  लागेल  ? हा प्रश्ण 


खूप दिवसापासून  एका स्पर्धेच्या निकालाची वाट पहात  आहे.  रुलिंग प्लेनेट्च्या मदतीने त्याचे उत्तर  शोधण्याचा  प्रयत्न केलाय. बघू  बरोबर येतोय का अंदाज 

आज २ जून २०१५
वेळ १२ वाजून १५ मिनिटे 

आताच्या वेळेला खालील ग्रहांचा अंमल आहे 

लग्न : सिंह - रवी 
नक्षत्र - अनुराधा - शनी 
राशी - वृश्चिक  - मंगळ 
दिवस - मंगळवार  - मंगळ 

निकाल हा साधारणपणे लागायला पाहिजे होता पण अजून लागला नाही .  घटना येत्या काही दिवसात घडणे अपेक्षित आहे , त्यामुळे चंद्राचे भ्रमण पाहू

  ( चंद्र नक्षत्र आणि राशी स्वामी  हे दोन्ही रुलिंग मध्ये असलेले कॉम्बीनेशन हुडकायचे आहे )

आज चंद्र ' अनुराधा ' या शनीच्या नक्षत्रात आहे,  उद्या तो जेष्ठा या ' बुधाच्या नक्षत्रात असेल . 
' बुध ' रुलिंग मध्ये नाही  ( वर उल्लेख केल्याप्रमाणे रवी , शनी , मंगळ हेच   ग्रह रुलिंग मध्ये आहेत )
चंद्र त्यानंतर '  मुळ '  नक्षत्रात जाईल,  मुळ नक्षत्राचा मालक  ' केतू '  ही रुलिंग मध्ये नाही . त्यानंतर चंदाचे भ्रमण  होईल  पु. षाढा नक्षत्रातून - इथे  पु. षाढा नक्षत्राचा मालक  ' शुक्र ' ही रुलिंग  मध्ये नाही 
त्यांतर येणा-या उ.षाढा नक्षत्रात चंद्र येईल   त्याचा मालक  ' रवी ' रुलिंग मध्ये आहे पण त्याचे पहिले चरण धनू राशीत येते आणि   ' गुरु ' रुलिंग मध्ये नाही 
 उ.षाढाच्या २ - चरणात चंद्र आला की  तो मकर राशीत येईल 

इथे रवी ( उ.षाढा नक्षत्राचा मालक  आणि शनी ( मकर राशीचा मालक )   दोनही  रुलिंग मध्ये आहेत 

पण ' शनी '  रुलिंग मध्ये  आला की पहिले कॉम्बीनेशन सोडायचे असा  नियम आहे

पुढे चंद्र श्रवण नक्षत्रात असेल इथे , श्रवण नक्षत्राचा मालक  ' चंद्र ' रुलिंग मध्ये नाही . पुढे चंद्र  धनिष्ठा  नक्षत्रात येईल   धनिष्ठा नक्षत्र - मालक ' मंगळ ' आणि मकर रास - मालक ' शनी  '  दोघेही  रुलिंग मध्ये आहेत , हा दिवस असेल रविवार  ७ जून . चंद्र  संध्याकाळी  ४. नंतर  धनिष्ठा नक्षत्रात येत आहे . अर्थात रविवारी निकाल लावला जातोच असे नाही 
सोमवारी  दुपारी ३ पर्यंत धनिष्ठा नक्षत्र आहे ( सोमवारी पहाटे ३. नंतर ' कुंभ रास चालू होते, मात्र कुंभ राशीचा मालक ही शनीच आहे ) त्यामुळे  रविवार संध्याकाळी  ४ ते सोमवार दुपारी ३ पर्यंत निकाल लागेल अशी अपेक्षा 

असो , जेंव्हा केंव्हा निकाल लागेल तेंव्हा इथे अवश्य कळवीन , अगदी तारीख चुकली  असेल तरी 
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
८ जून २०१५

आत्ता  या क्षणी म्हणजे  ८ जूनला  १६. २५ वाजलेत आणि अपेक्षित  निकाल अजून कळला नाही , याचा अर्थ  इतकाच वरील लिहिलेला अंदाज चुकला आहे . 


1 comment:

विजयकुमार देशपांडे said...

प्रयत्न तरी छान केला . शुभेच्छा .

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या