November 23, 2015

तुलसी विवाह

तुलसी विवाह — कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीविवाह केला जातो .काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावतात. नित्यनेमाने त्याला पाणी घालून वाढवतात. मग तिचा विवाह लावतात. या विवाहात तुळस ही वधू, बाळकृष्ण वर, आणि ऊस हा मामा असे मानले जाते.त्यासाठी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. तुळशीभोवती रांगोळी काढतात. तुळशीच्या चारही बाजूने ऊस लावून ऊसाचा मांडव तयार करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची ,फुले, चिंचा, आवळे ठेवतात. तुळशीच्यासमोर पाटावर तांदळाचे स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते. संध्यकाळी सूर्य मावळल्यावर कृष्णाबरोबर अंतरपाट, मंगलाष्टक, मणीमंगळसूत्र, ओटीचे सामान या साहित्यासमवेत सर्व विवाहविधीनुसार तुळशीचे लग्न लावले जाते.

 यासंबंधी एक कथा सांगितली जाते ती पुढील प्रमाणे जालंधर नावाचा राजा प्रजेला खूप त्रास देत असे. त्याची पत्नी वृंदा ही प्रतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्यपुण्यामुळे विष्णूला जालंधराला मारणे अवघड होऊन बसले. तेव्हा श्रीविष्णूने जालंधराचे रूप घेऊन वृंदेच्या पातिव्रत्याचा भंग केला. त्यामुळे त्याला जालंधराचा वध करता आला.हे सर्व वृंदेला समजताच तिने विष्णूला शाप दिला. .व ती स्वत; सती गेली. तिच्या मृत्युच्या ठिकाणी एक वनस्पती उगवली, तीच तुळस . म्हणून विष्णूला तुळस प्रिय असते. अशीही एक कथा सांगण्यात येते. पुढे द्वापार युगात याच वृंदेने रुक्मिणी होऊन कृष्णाशी कार्तिक शुद्ध द्वादशीला लग्न लावले. त्यावेळेपासून तुलसीविवाहास प्रारंभ झाला असे मानतात. . तुलसी स्तोत्र ——


 तुलसी सर्व प्रतांना महापातक नाशिनी | अपवर्ग प्रदे देवी वैष्णवाना प्रिय सम || सत्ये सत्यवतीचैव त्रेतया मानवी तथा | द्वापारे चावतीर्णासि वृंदात्व तुलसी क्ली: || 


 काही मंगलाष्टके -

स्वस्ति श्री गणनायक गजमुखं मोरेश्वरं सिध्दीदम् । 
बल्लाळं मुरूड विनायक मढं चिंतामणी थेवरम् ॥
लेण्याद्री गिरिजात्मक सुवरदम् विघ्नेश्वरं ओझरम् । ग्रामे रांजम संस्थिते गणपती कुर्यात् सदा मंगलम्  ॥ 

 गंगा सिंधु सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा

 कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका 
क्षिप्रा वेत्रवती महा सुरनदी ख्याता ज्या गंडकी 
 पुर्णा पूर्ण जलै : समुद्र सहिता कुर्वंतु वो मंगलम

 रामो राजमणिः सदा विजयते | रामं रमेशं भजे | रामेणाभिहता निशाचरचमू | रामाय तस्मै नमः॥ रामान्नास्ति परायणं परतरं | रामस्य दासोऽस्म्यहम् । रामे चित्तलयः सदा भवतु मे| भो राममामुद्धर ||.\

 कुर्यात सदा मंगलम , शुभ मंगल सावधान

 तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव | विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि || || शुभ मंगल सावधान


सर्व माहिती  संग्रहीत 

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या